AurangabadCrimeUpdate : परिचारिकेवर लग्नाचे अमीष दाखवून अत्याचार, गर्भपातही घडवला, आरोपी फरार

औरंगाबाद- एक वर्षांपासून परिचारिकेशी संबंध जुळवून गर्भपात घडवून आणणार्या आरोपी विरुध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात बलात्कार व अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे तर यातील आरोपी फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
अंकुश रघुनाथ जामुंदे(२२) रा.माळेगाव ता.भोकरदन जि.जालना असे फरार आरोपीचे नाव आहे. गेल्या मार्च २०२१पासून त्याने एका परिचारिकेशी ओळख वाढवून तिचे शोषण केले.त्यानंतर पिडीतेने आरोपीला लग्नाची मागणी घालताच आरोपीने पिडीतेची जात लक्षात आणून दिली. यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी दिली. पुढील तपास उस्मानपुरा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त ढुमे करंत आहेत