AurangabadCrimeUpdate : अभियंत्याचे घर फोडले , १६ लाखांचा ऐवज लंपास

औरंगाबाद – एन ४ सिडको परिसरातील अभियंत्याचे घर फोडून चोरटयांनी १६ लाखांचा ऐवज ज्या मध्ये ४०० ग्रॅम सोने व १०० ग्रॅम चांदी अश्या वर्णनाचा लंपास केला या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . याप्रकरणी प्राप्त झालेल्या सी.सी. टीव्हीही फुटेज मध्ये स्पष्टपणे दिसत नसल्याचे पोलिसांनी सांगितले तसेच गुन्हेशाखा आणि पुंडलिकनगर पोलिसांनी रेकॉर्डवरच्या काही गुन्हेगारांची चौकशी केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली आहे,
कोपाक नरसिंह वेंकट स्वामी (५३) रा. द्वारकानगर विशाखा पट्ट्नम हल्ली. मु एन ४ सिडको धंदा इंजिनिअर असे फिर्यादीचे नाव आहे.चोरी गेलेल्या ऐवजामध्ये ४०० ग्रॅम सोने ज्यामध्ये सोन्याच्या बांगड्या, १ लाख ८४ हजारांची चैन,२ लाख रु चा हिऱ्याचा सेट; १०० ग्रॅम चांदी असा एकूण १६ लाख १४ हजार २५४ रु चा ऐवज चोरटयांनी घरात मागच्या भागातून प्रवेश करून चोरून नेला आहे, या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, तसेच पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शेषराव खटाने व एपीआय मनोज शिंदे करत आहेत