AurangabadCrimeUpdate : औरंगाबादेत एटीएम फोडण्याचा प्रयत्न , ८० हजाराचे नुकसान

औरंगाबाद – आज दुपारी दीड वा.एपीआय काॅर्नर समोरील एस.बी.आय.बॅंकेचे एटीएम दोन चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न करंत ८० हजारांचे नुकसान झाले या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चोरट्यांनी एटीएम मधे प्रवेश करताच तेथील सी.सी.टि.व्ही.कॅमेरे मोडले व एटीएम मशीनचे डायल पॅड ,कॅश डिस्पेंसर,तोडले.पण एटीएम मशीन मधील कॅश चोरता आली नाही. या प्रकरणी एस.बी.आय.बॅंकेचे एटीएम चॅनल मॅनेजर सुहास दिगंबर कुलकर्णी यांनी तक्रार दिल्यानंतर संध्याकाळी ६ वा. गुन्हा दाखल झाला.पुढील तपास पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बाळासाहेब आहेर करंत आहेत