AurangabadCrimeUpdate : अवैध गॅस रिफीलिंगचा अड्डा, सिटीचौक पोलिसांकडून कारवाई तिघांना अटक

औरंगाबाद – माजी नगरसेवक जावेद हसन खान यांनी लोटाकारंजा भागात किरायाने दिलेल्या जागेवर वैध गॅस रिफीलिंगचा सुरु असलेला अड्डा सिटी चौक पोलिसांनी उध्वस्त करत ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला व तिघांना अटक केली. शेख आरफान शेख सामी (२४) शेख फाजील शेख इरशाद(२३) दानिश शहा शकील शहा (१९) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
या ठिकाणाहून गॅस सिलेंडर, वजन काटे, रिफीलिंग चे साहित्य असे ५लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले.वरील कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक थोरात, पोलिस निरीक्षक अशोक गिरी, अशोक भंडारे , एपीआय एम.एम. सय्यद व पोलिस कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता.