MarathwadaNewsUpdate : धक्कादायक : बढतीच्या यादीत नाव आले, शुभेच्छांचा वर्षाव सुरु होता पण व्हावे लागले गजाआड !!

- बीड: तीन दिवसांपूर्वीच बीड पोलिसात सहायक निरीक्षक म्हणून पदोन्नती झाल्याने शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच ४० हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याने पाटोद्यातील एका पीएसआयला गजाआड व्हावे लागल्याची घटना घडली आहे.
त्याचे झाले असे कि , एका जबरी लुटीच्या गुन्ह्यात जप्त केलेला मोबाईल आणि आरोपीस अटकपूर्व जामीनासाठी सहकार्य करण्यासाठी बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी संबंधितांकडे केली होती. या प्रकरणी तडजोडअंती ४० हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अफरोज तैमीरखा पठान याना लाचलूचपत विरोधी विभाग-एसीबीने अटक केली आहे.
अफरोज तैमीरखा पठान हे पाटोदा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कर्तव्यावर होते. त्यांनी तक्रारदाराकडे गुन्ह्यातील मोबाईल परत देण्यासाठी व तक्रादाराच्या भावास अटकपूर्व जामीन मंजूर करून गुन्ह्यात वापरलेली जप्त गाडी व पिस्टल सोडविण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. याच प्रकरणात ४० हजार रुपये घेताना आपल्यावर कारवाई होणार असल्याचा संशय आल्याने उपनिरीक्षक पठाण यांनी ही लाच स्वीकारली नाही. या प्रकरणी एसीबीने सखोल चौकशी केली असता पठाण यांनी लाच मगितल्याच मान्य केल्याने अखेर एसीबीने त्यांना लाच मगितल्याच्या आरोपाखाली अटक केली.