WorldNewsUpdate : समजून घ्यावे असे काही : रशिया-युक्रेनचा वाद नेमका काय आहे ?

युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून या परिस्थीतीची नेमकी करणे काय आहेत ? याचा विचार केला असता नाटोचा ‘पूर्वेकडील विस्तार’ संपवण्याची मागणी केल्यामुळे युरोपमध्ये युद्ध सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या हल्ल्याचे आदेश दिले आहेत.
या वादाशी संबंधित महत्त्वाची माहिती अशी आहे…
मुळात असे आहे कि , युरोपियन संघटना, नाटो आणि युरोपियन युनियनच्या दिशेने जाण्याच्या युक्रेनच्या हालचालीला रशियाने दीर्घकाळ विरोध केला आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दाव्यानुसार युक्रेनचे वर्तन पश्चिमेकडील च्या कठपुतलीसारखे आहे कारण युक्रेन कधीही पूर्ण विकसित देश नाही. त्यामुळे युक्रेन ‘नाटो’ (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) मध्ये सामील होणार नाही याची हमी त्यांनी पाश्चात्य देशांकडून मागितली आहे.
पूर्वीच्या सोव्हिएत युनियनचा देश म्हणून, युक्रेनचे रशियाशी सामाजिक संबंध आहेत आणि येथे रशियन भाषा विपुल प्रमाणात बोलली जाते, परंतु रशियाच्या आक्रमणानंतर हे संबंध बिघडले आहेत.
दरम्यान 2014 मध्ये रशिया समर्थक राष्ट्राध्यक्षांची हकालपट्टी झाल्यावर रशियाने युक्रेनवर हल्ला केला. तेव्हापासून आतापर्यंत 14 हजारांहून अधिक लोकांना या संघर्षात आपला जीव गमवावा लागला आहे.
हा संघर्ष लक्षात घेता डोनबास क्षेत्रासह पूर्व युक्रेनमधील संघर्ष टाळण्यासाठी रशिया आणि युक्रेनने मिन्स्क शांतता करारावर स्वाक्षरी केली, परंतु संघर्ष सुरूच असल्याने रशियाने म्हटले आहे की, आम्ही संघर्ष क्षेत्रामध्ये शांतता सैनिक पाठवत आहोत. तर दुसरीकडे, पाश्चिमात्य देशांनी याला ‘रशियाकडून होणारी फसवणूक’ म्हटले आहे.
दरम्यान रशियाच्या या पवित्र्यामुळे युरोपियन युनियनच्या सीमेवर रशिया आणि युक्रेन यांच्यातील ताज्या तणावाबद्दल युरोपियन युनियनची चिंता वाढली आहे. यामुळेच मोठ्या संख्येने NATO देशांचा समावेश असलेल्या युरोपियन युनियने रशियावर निर्बंध लादण्याची घोषणाकेली आहे.
रशियाच्या हल्ल्यावर युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विटरवर म्हटले आहे की, “पुतिन यांनी युक्रेनवर युद्ध घोषित केले आहे. युक्रेनच्या शांततापूर्ण शहरांवर रशियाकडून हल्ले होत आहेत. त्यामुळे हे एक आक्रमक युद्ध आहे. या युद्धापासून युक्रेनही स्वतःचा बचाव करेल आणि जिंकेल. याकडे जगाचे लक्ष असून पुतिनला थांबवण्यासाठी जगाने काहीतरी करण्याची वेळ आली आहे.
याच पार्श्वभूमीवर काही आठवड्यांपूर्वी, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन तणाव कमी करण्यासाठी रशियाच्या अध्यक्षांशी बोलण्यासाठी मॉस्कोला गेले होते. मात्र त्यातून कोणताही मार्ग निघाला नाही. दरम्यान सध्या निर्माण झालेल्या युद्धसदृश स्थितीवर युक्रेनची राजधानी कीव येथील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, युक्रेनमध्ये बरीच अनिश्चितता आहे. त्यामुळे भारतीयांनी संयमाने आणि शांततेने आपल्या घरात, वसतिगृहात आणि रस्त्यांवर जिथे कुठेही असाल तिथे सुरक्षित रहा.