Oscar 2022 ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सिनेप्रेमींना यंदा मतदान करता येणार

‘ऑस्कर २०२२’ पुरस्कार सोहळ्यात यंदा सिनेप्रेमींना मतदान करता येणार आहे. चाहते मतदान करून त्यांच्या आवडत्या सिनेमाला ‘ऑस्कर पुरस्कार’ मिळवून देऊ शकतात. ‘फॅन फेव्हरेट’ असे या पुरस्काराचे नाव आहे.
‘ऑस्कर पुरस्कार’ हा जगातील सर्वात मोठ्या पुरस्कारांपैकी एक आहे. ट्विटरद्वारे सिनेप्रेमींना हे मतदान करता येणार आहे. २७ मार्च रोजी ‘ऑस्कर पुरस्कार’ सोहळा होणार आहे. नुकतेच ९४ व्या ऑस्कर पुरस्कारांचे नामांकन जाहीर झाले होते. यात ‘द पॉवर ऑफ डॉग’ या सिनेमाला सर्वाधिक नामांकन मिळाले. या सिनेमाला १२ नामांकने मिळाली आहेत. भारतीय सिनेरसिक ‘जय भीम’ या सिनेमाला ऑस्करमध्ये नामांकन मिळावे, अशी प्रतीक्षा करत होते. पण नामांकनाच्या शर्यतीत हा सिनेमा टिकू शकला नाही. पण राइटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले आहे.