UttarPradeshElectionUpdate : भाजप , सपा , पाठोपाठ काँग्रेसचे ‘उन्नती विधान’ जाहीर

लखनऊ : भाजप आणि समाजवादी पार्टीच्या पाठोपाठ काँग्रेसच्या वतीने उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यासाठी आपला निवडणूक जाहीरनामा ‘उन्नती विधान’ जारी केला आहे. या जाहीरनाम्यात महिला आणि तरुण मतदारांना डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशात सात टप्प्यात मतदान होत असून त्या पार्श्वभूमीवर हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या विषयी बोलताना प्रियंका गांधी वाड्राने यांनी सांगितले की, आम्हाला सरकार बनविण्याची संधी मिळताच १० दिवसांच्या आत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करेल. तसेच 2500 रुपये गव्हाला तर उसाला 400 रुपये भाव देण्यात येईल. आणि शेतकऱ्यांना वीजबिलात अर्धी सूट दिली जाईल. कोरोनाबाधित परिवाराला २५०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. याशिवाय 20 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यात येतील तर 40% महिलांना नोकरीत आरक्षण दिले जाईल. यातील जो उन्नत विधान , शक्ती विधान आणि भरती विधान जारी केले आहे
या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना प्रियंका म्हणाल्या कि, नोकऱ्यातील आउटसोर्सिंग बंद केले जाईल तसेच सध्या कंत्राटवर कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले जाईल. राज्यातील संस्कृत आणि उर्दू शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात येतील. काँग्रेसकडून शेणाला 2 रुपये किलो भाव दिला जाईल. झोपडपट्यामधून राहणाऱ्या नागरिकांना त्यांची घरे जमिनीसह प्रदान करण्यात येतील. सरपंचाचे वेतन 6000 रू. तर चौकीदारांचे वेतन 5000 रुपये केले जाईल.कोरोनामुळे मरण पावलेल्या कोरोनायोद्ध्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये दिले जातील. सर्व शिक्षण मित्रांना नोकरीत कायम केले जाईल. अनुसूचित जाती -जमातीच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात येईल. कारागीर , विणकर समाजासाठी विधान परिषदेत एक जागा आरक्षित केली जाईल. तसेच दिव्यांग व्यक्तींना 6000 वेतन देण्यात येईल. होईल.महिला पोलिसांना त्यांच्या निवासाच्या शहरात , गावात पोस्टिंग दिली जाईल.
काँग्रेसने हा जाहीरनामा तयार करताना प्रत्यक्ष लोकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांनुसार तयार केला असून राज्यातील नागरिकांचा महागाई आणि बेरोजगारी हा प्रमुख मुद्दा असल्याचे पक्षाच्या महासचिव प्रेयंका गांधी वाड्रा आणि माजी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी सांगितले.