Aurangabad : दोन आयशर ट्रकमध्ये भीषण अपघात, ५ जणांचा मृत्यू, २२ गंभीर जखमी

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : वैजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिवराई फाट्याजवळ दोन आयशर ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून २२ जण गंभीर जखमी आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णलयाल हलवण्यात आले आहे.

Advertisements

औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील औरंगाबाद लासूर रोडवरील हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या वाहनातून एका गाडीत लग्नाचे वऱ्हाड होते. वऱ्हाडी औरंगाबाद वरून नाशिककडे लग्न समारंभासाठी निघाले होते. पहाटे तीन वाजेच्या सुमारास दोन्ही आयशरमध्ये हा अपघात झाला आहे. अपघातात २२ जण जखमी तर ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींपैकी ४ जणांवर औरंगाबादमध्ये उपचार सुरू आहेत तर बाकी जखमींना नाशिक येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

Advertisements
Advertisements

अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी तीन जणांची नावं- कविता आबासाहेब वडमोर (वय वर्ष ४५), प्रज्ञा गौतम गायकवाड (वय वर्ष १७), मोनू दिपक वावहळे (वय वर्ष ८) मृत पाच जणांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. जखमींना औरंगाबाद आणि नाशिक येथे हलवण्यात आले  आहे. पहाटे तीनच्या सुमारास शिवराई फाटा येथे हा अपघात झाला आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात लग्न लावून हे वऱ्हाडी नाशिकला जात होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!