अभिव्यक्ती : कळीचा मुद्दा : छत्रपतींना चापट मारणे ही विकृत आणि नीच मानसिकता !! -डॉ.श्रीमंत कोकाटे

मालिकेद्वारे छत्रपतींना चापट मारण्याची सनातन्यांची हिंमतच कशी काय होते ?. स्वामी समर्थाने छत्रपतींकडे वाकड्या नजरेने जरी पाहिले असते तर छत्रपतींनी त्याला सोडला असता का ? छत्रपतींचा द्वेष करायचा, त्यांची बदनामी करायची, त्यांना न घडलेली घटना रंगवून चापट मारायची, स्वामी समर्थाचे महत्व वाढवण्यासाठी छत्रपतींना हीन लेखायचे ही विकृती आहे. हा मानसिक नीचपणा आहे. अशा घाणेरड्या मनोवृत्तीवर कारवाई झाली पाहिजे !
भारतीय समाजव्यवस्थेत असा एक विकृत वर्ग आहे की जो पदोपदी महावीर, बुद्ध, बळीराजा, संत नामदेव, संत तुकाराम, शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले, शाहू, आंबेडकर इत्यादी महामानवांचा विविध प्रकारे द्वेष करत असतो. तो वर्ग या महामानवांना मारू इच्छित असतो, परंतु आज ते जिवंत नाहीत, मग ते विविध कलाकृतीच्या माध्यमातून महामानवांना मारण्यासाठी ते परकाया प्रवेश करत असतात. असेच स्वामीच्यात प्रवेश करून ती विकृती त्यांनी विध्यमान ठेवलेली आहे. शिवाजीराजे-रामदास संबंध जोडण्यासाठी देखील अशाच अनेक विकृत कथा या विकृतांनी रचल्या आहेत.
स्वामी समर्थ ज्यांचे श्रद्धास्थान आहे, त्यांनी जरूर त्यांची भक्ती करावी, परंतु त्या भक्तीपोटी छत्रपतींना चापट मारण्याचे कारण काय ?. चापट मारण्यात स्वामीचा काय पराक्रम आहे ?. समजा नजराणा स्वीकारायचा नव्हता तर तो साधुत्वाला शोभेल अशा नम्र पध्दतीने तो नाकारता आला असता, परंतु उठून दातओठ खात सद्ग्रस्थाच्या कानशिलात चापट मारणे हे तर अतिरेक्यांचे-गावगुंडाचे लक्षण दिसत आहे. खरच अशी चापट मारायची हिम्मत जरी केली असती तर छत्रपतींनी अशा भोंदूला सोडले असते का?
परंतु बनावट कथा रचायच्या, ब्राह्मणी वर्चस्व वाढविण्यासाठी महापुरुषांच्या गुरूस्थानी एखादा भट आणून बसवायचा, त्याच्या हातून महापुरुषांना मारहाण करायची, त्यांचा उपमर्द करायचा हा सनातनी विकृत धंदा आहे. ही विकृती घेऊनच अनेक सनातनी कलाकार, लेखक, निर्माते, दिग्दर्शक, नाटककार, मालिकावाले जगत असतात. अशी विकृती वेळच्या वेळी ठेचली तर ठीक नाहीतर अशाच खोटया बाबींचा इतिहास तयार होतो.