ऑगस्टा वेस्टलँड व्यवहारात भ्रष्टाचारप्रकरणी संशयाची सुई काॅंग्रेसवर

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ऑगस्टा वेस्टलँड व्यवहारात भ्रष्टाचारप्रकरणी मुख्य आरोपी ख्रिश्चिअन मिशेलने भ्रष्टाचाराच्या व्यवहाराच्या फाईलमध्ये शॉर्ट फॉर्ममध्ये लिहीण्यात आलेल्या नावांचा खुलासा केला आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुरवणी आरोपपत्रात याचा उल्लेख केला असल्याने काॅंग्रेसनेते टार्गेट होण्याची शक्यता वाढली आहे.
ईडीने व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी गुरुवारी कोर्टात चौथे आरोपपत्र दाखल केले. यामध्ये ईडीने म्हटले की, चौकशी दरम्यान या व्यवहाराच्या फाईलमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या शब्दांच्या संक्षिप्त रुपांचा उलगडा मिशेलने केला आहे. त्याने सांगितले आहे की, fam या इंग्रजी शब्दाचा अर्थ फॅमिली असा होतो. तसेच AP म्हणजे काँग्रेसच्या एका टॉपच्या नेत्याचे नाव आहे. त्याचबरोबर इतरही काही संक्षिप्त शब्दांचे अर्थ म्हणजे हवाई दलातील अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी आणि तत्कालीन सत्ताधारी पक्षाचे टॉप नेते यांची नावे आहेत. हा व्यवहारात ३ कोटी युरोचा भ्रष्टाचार झाला आहे.