OmicronMaharashtraUpdate : महाराष्ट्राची चिंता वाढली , आरोग्यमंत्र्यांनी दिली धक्कादायक माहिती…

मुंबई : ओमायक्रॉनच्या विषाणूने भारतात चिंता वाढवलेली असताना एकट्या महाराष्ट्रातच आज ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेले दहा रुग्ण आढळले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी याबद्दल माहिती दिली आहे. या नवीन विषाणूचा संसर्ग लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणात होत असून त्याबद्दल चिंता व्यक्त केली जात असतानाच महाराष्ट्रात आढळून आलेल्या १० नव्या रुग्णांमुळे भारतामध्ये आता हि ३३ रुग्ण आढळून आले आहेत.
https://twitter.com/ANI/status/1468559266982162434?
आरोग्यमंत्री टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार , “महाराष्ट्रात आज एकूण १० ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सुमारे ६५ स्वॅब जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आमच्याकडे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी ३ लॅब आहेत. येत्या काळात नागपूर आणि औरंगाबादमध्ये आणखी लॅब उघडणार आहोत,” असं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. दरम्यान, आज आढळलेले रुग्ण हे राज्यातील कोणत्या शहरातील आहेत, याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.
यापूर्वी मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण होते. आज आढळलेल्या रुग्णांसह राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णसंख्या २०वर पोहोचली आहे. तर देशपातळीवर ही संख्या वाढली आहे. देशामधील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहे. दरम्यान महाराष्ट्राखालोखाल राजस्थानमध्ये नऊ, कर्नाटकमध्ये दोन तर गुजरातमध्ये ओमायक्रॉनबाधित एक रुग्ण आढळून आलाय. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्येही ५ डिसेंबर रोजी एक ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून आला आहे.