AurangabadNewsUpdate : बंटी बबली ला वेदांतनगर पोलिसांनी सापळा रचून पकडले

औरंगाबाद – नागरिकांचे मोबाईल हिसकावणार्या बंटी बबली ला वेदांतनगर पोलिसांनी सापळा रचून ५कि.मी. पाठलाग करंत पकडले. ऋषीकेश रमेश रोडे(२१) आणि मानसी ऋषीकेश रोडे(१९) असे चोरट्या जोडप्याचे नाव आहे. रात्री अपरात्री रेल्वेने प्रवास करुन येणार्या प्रवाशांचे मोबाईल वरील चोरट्या जोडीने हिसकावल्याची तोंडी माहिती वेदांतनगर पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार वेदांतनगर पोलिसांनी साध्या वेषातील पथके गस्तीवर ठेवली होती.
दरम्यान ६डिसेंबर रोजी पदमपुरा भागात कांचनवाडी परिसरात राहणारा विद्यार्थी सुदर्शन दत्तात्रेय गायके रा पैठणगेटहून कपडे खरेदी करुन कांचनवाडीला रात्री १०च्या सुमारास परतंत होता.त्याचवेळेस गायके याचा मोबाईल मोटरसायकलवरुन येणार्या बंटी आणि बबली ने हिसकावून पळ काढला.या घटने मुळे गांगरलेल्या गायकेने आरडाओरड करताच साध्यावेषातील पोलिसांनी ५कि.मी. पाठलाग करंत बंटीबबली ला पोलिस ठाण्यात आणले.त्यांनी गायकेचा मोबाईल हिसकावल्याची कबुली दिली. वरील कारवाई पोलिसउपायुक्त उज्बला वानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिसआयुक्त विवेक सराफ, पीएसआय प्रमोद देवकाते पोलिस कर्मचारी रामकृष्ण आडे, सचिन जाधव यांनी पार पाडल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात दिली आहे