AurangabadNewsUpdate : अनपेड ई- चालानचा भरणा करण्यासाठी सुविधा

औरंगाबाद : वाहतूक नियमांचे उल्लन्घन केल्यानंतर झालेल्या कारवाई मध्ये वाहनधारक अनपेड चालान भरण्यासाठी दिरंगाई करतात. त्यांच्यासाठी शहरात ५ ठिकाणी सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना एसएमएस द्वारे सूचित करण्यात आलेले आहे. अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी जारी केलेल्या आदेशात म्दिली आहे.
खालील पद्धतीने भरणा करता येईल.
१) रोख स्वरूपात जे ५ ठिकाणी वाहतूक शाखेचे कार्यालय आहेत . किंवा शहरातील मुख्य रस्त्यांवर विविध ठिकाणी हजर असलेले अधिकारी, अंमलदार, यांचाकडे भरू शकता .
२) डेबिट, किंवा क्रेडीट कार्ड द्वारे,
३)चालान केल्यानंतर वाहनधारकाला गेलेल्या मेसेजला टच करून
४) महाऍट्रॅफिक ऐप गुगल प्ले स्टोअर वरून
५) mahatrafficechallan.gov.in या वेबसाईटवर दंडाचा भरणा करण्यात येतो.
जे कारवाई झालेले वाहन धारक चालान भरण्यासाठी दिरंगाई करतील त्यांना येत्या ११ डिसेंबर रोजी सकाळी १० वा . जिल्हा सत्र न्यायालयाच्या लोकअदालत मध्ये हजार राहावे लागेल . असेही वानखेडे यांनी सांगितले.