AurangabadCrimeUpdate : सहा महिन्यानंतर खुनी जोडपे जेरबंद

औरंगाबाद : हा महान्यांपूर्वी केलेल्या खुनाचे वातावरण निवळले आहे का? हे चेक करण्यासाठी आलेल्या खुन्याला पोलिसांनी काल रात्री ११ वा. अटक केली.तर त्याची बायको माहेरुन आज आली असता तिला दुपारी अटक केली. या दोन्हीही आरोपींना पोलिसांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी मार्च मधे किरकोळ कारणावरुन आरोपीने चाकुने खून केला होता. लक्ष्मण रघुनाथ चव्हाण रा.मिटमिटा असे मयताचे नाव आहे.तर
संजय गोलू काळे (२८) धंदा मजूरी व त्याची बायको उषा संजय काळे अशी अटक आरोपींची नावे आहेत.
या बाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , दि. १३ मार्च रोजी मिटमिटा येथील तलावा जवळील शिवारात मद्यपानानंतर संजय काळे याने दारुच्या नशेत चव्हाण याचा पाठीवर थाप मारली म्हणून खून केला होता.त्यावेळी मयताला संजय काळे च्या बायकोने घाटी रुग्णालयात नेले होते व तेथील डाॅक्टरांना स्वता:चे खोटे नाव सांगितले होते. चव्हाण यांना मयत घोषितकेल्यावर उषा काळेही नवर्या सोबंत फरार झाली होती.वरील कारवाई पोलिसउपायुक्त उज्वला वानकर,सहाय्यक पोलिसआयुक्त विवेक सराफ, पोलिस निरीक्षक शरद इंगळे ,यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पांडुरंग भागिले,पीएसआय डाके, पोलिस कर्मचारी नागरगोजे यांनी पार पाडली.