MarathawadaNewsUpdate : राजेश टोपे यांच्याविषयी अवमानास्पद उद्गार , आ. बबन लोणीकर यांच्याविरुद्ध गुन्हा

जालना : जालना जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांच्याविरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याप्रकरणी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शिवप्रसाद चांगले यांनी लोणीकर यांच्याविरुद्ध जालन्यातील अंबड पोलीस ठाण्यात अपमान आणि भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली.
याबाबतची अधिक माहिती अशी कि , जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधीचे असमान वाटप होत असल्याचा आरोप करत लोणीकर यांनी गुरुवारी जालना येथील कार्यालयात निदर्शने केली होती. परतूर मतदारसंघातील पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याबद्दल लोणीकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी त्यांनी “पालकमंत्री राजेश टोपे हा राज्यपालांच्या पोटचा आहे का? हरामखोर…” असा वादग्रस्त उल्लेख केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी लोणीकर यांच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. ते म्हणाले की, लोणीकर यांनी राजेश टोपे यांच्या विरोधात बोललेले शब्द चुकीचे आहेत.