AurangabadCrimeUpdate : रेकॉर्डवरच्या अल्पवयीन गुन्हेगारांकडून लुटीचे ४३ हजार जप्त

औरंगाबाद – आझाद चौकातील पेट्रोलपंप लुटणार्या दोन अल्पवयीन चोरटयांना शहाबाजार परिसरातून जिनसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्ययातून १लाख ३३ हजार रुपयांपैकी ४३ हजार रु जप्त केले आहेत. उरलेली रक्कम चोरटयांनी मौजमजेसाठी उडवली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
दोन्ही अल्पवयीन चोरटयांपैकी एक रेकॉर्डवरचा आहे. त्याचा मामाही सिटीचौक परिसरातील हिस्ट्रीशिटर असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. वरील;या कारवाई पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गोकुळ ठाकूर करत आहेत