AurangabadCrimeUpdate : कथित पिडीतेला दामदुपटीचे अमीष दाखवून २० लाख हडपले ,गुन्हा दाखल

औरंगाबाद : कथित पिडीतेने ओळखीच्या साथीदाराविरुध्द २० लाख रु.हडपल्याच्या तक्रारीवरुन जिन्सी पोलिस ठाण्यात एका विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
नदीम अल्लीमुद्दीन शेख (३५) रा. टाईम्स काॅलनी असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. फिर्यादीकडून आरोपीने जानेवारी मध्ये दिलेली रक्कम सहा महिन्यात दामदुप्पट करुन देण्याचे अमीष दाखवले अशी तक्रार जिन्सी पोलिसांना प्राप्त झाली. या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पिडीतेने अंदाजे दोन वर्षांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर बलात्काराचा आरोप केल्यामुळेही गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळेस आरोपी नदीम शेख हा कथित पिडीतेसोबंत राहात होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय तांगडे करंत आहेत.