महिला पोलिसउपनिरीक्षकाला विद्यार्थीनींची मारहाण, एक अटक

औरंगाबाद – दामिनी पथकातील महिला पोलिस उपनिरीक्षकाला व त्यांच्या सोबंतच्या कर्मचार्याला किरकोळ कारणावरुन मारहाण करणार्या तरुणीला बेगमपुरा पोलिसांनी अटक केली आहे.
शुभांगी आकाश कारके (२१) रा.फाजलपुरा एसटी काॅलनी असे अटक आरोपीचे नाव आहे. तर तिची लहान बहीण अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी नोटीस देत समज दिली.
आरोपी शुभांगी कारके ही बहीणी सहित जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील असलेल्या अण्णाभाऊसाठे चौकातील उद्यानातून काल संध्याकाळी ५च्या सुमारास माती नेतांना उद्यानातील कर्मचार्याने मज्जाव केला असता दोघींनी कर्मचार्याशी हातापाई केली. हा प्रकार नियंत्रण कक्षाकडून दामिनी पथकाला कळला असता घटनास्थळी पथक पोहोचले. त्या पथकात पोलिस उपनिरीक्षक फिर्यादी सुवर्णा उमाप(३१) होत्या त्या भांडण सोडवण्यास गेल्या असता त्यांना मारहाण करत जमीनीवर पाडले. तर पोलिस कर्मचारी आशा गायकवाड यांचे त्यांच्याच काठीने डोके फोडले. तर अन्य महिला पोलिस कर्मचारी लता जाधव यांचा हात पिरगाळला. या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी शुभांगी कारके हिला अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बोडखे करत आहेत.