AurangabadNewsUpdate : पोलीस स्मृती दिनानिमित्त शाहिदाना अभिवादन , चित्त थरारक प्रत्यक्षिकाने उपस्थितांची मने जिंकली…

औरंगाबाद : पोलीस स्मृती दिना निमित्त आज पोलीस आयुक्तालयात सन २०२० व २१ मध्ये जे अधिकारी-जवान धारतीर्थ पडले आहे.त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या वेळी देशात धारतीर्थी पडलेल्या एकूण ३७७ जवानांच्या नावाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर आयुक्तालयाच्या मैदानात पोलिसांच्या विविध पथकाने चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.या प्रत्यक्षिकाने उपस्थितांची मने जिंकली. तर विविध शस्त्राने प्रदर्शन देखील उपस्थितांसाठी ठेवण्यात आले होते.
या वेळी विभागीय आयुक्त सुनिक केंद्रेकर, पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, खासदार इम्तियाज जलील, माजी महापौर नंदकुमार घोडले, ग्रामीण पोलीस अधीक्षक निमित्त गोयल, उपायुक्त अपर्णा गीते, उपायुक्त उज्वला वनकर, उपायुक्त दीपक गिर्हे, साह्ययक आयुक्त सुरेश वानखेडे, सह पोलीस अधिकारी कर्मचारी सह नागरिकांची उपस्थिती होती.