AurangabadCrimeUpdate : बलात्कारी आरोपीची अटक आजारामुळे तूर्तास टळली, गुन्हा दाखल

औरंगाबाद : गेल्या तीन वर्षांपासून शहरातील वानखेडेनगर, बजाजनगर व पुणे या ठिकाणी नेत लग्नाचे अमीष दाखवून लैंगिक शोषण करणार्या मजूरा विरुध्द बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राजेश प्रेमानंद पवार (२८) रा.बजाजनगर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर सध्या मणक्याचे उपचार सुरु असल्यामुळे त्याला अटक करु नये असे डाॅक्टरांनी सांगितल्यामुळे पोलिस अटकेसाठी डाॅक्टरांच्या परवानगीची वाट पहात आहेत.
दरम्यान राजेश पवार ने २०१८साला पासून ३१आॅगस्ट २०२१पर्यंत पिडीतेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.तसेच आरोपीने जबर मारहाण करंत ब्लेड ने हातावर वार केल्याचे पिडीतेने नमूद केलेले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शेख करंत आहेत.