AurangabadCrimeUpdate : चार चाकी वाहनांची तोडफोड, नशेखोर अटकेत

औरंगाबाद – वेदांतनगरात राहणार्या व्यापारी,वकीलांच्या१४ चारचाकी वाहनांची तोडफोड करुन २लाख २८हजारांचे नुकसान करणार्या ५३हजार६००रु.चा ऐवज चोरणार्या नशेखोराला वेदांतनगर पोलिसांनी १२तासाच्या आत बेड्या ठोकल्या.
आशिश संजय भोरगे(२०) रा.नागसेनवन असे अटक आरोपीचे नाव आहे.आरोपीच्या ताब्यातून दोन लॅपटाॅप, हार्डडिस्क व रोख रक्कम असा एकूण ५३हजार ६०० रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२६आॅगस्टच्या मध्यरात्री वेदांतनगर परिसरातील उच्चभ्रूवस्तीत घूसुन वरील आरोपीने १४महागड्या कार फोडल्या. या प्रकरणाची तक्रार दाखल होताच पोलिस निरीक्षक सचिन सानप, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल कंकाळ, यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला शोधून बेड्या ठोकल्या.
पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरील कारवाई पार पडली.पोलिस कर्मचारी मंगेश अभंग, शिवराज बिरारे,बाळासाहेब ओवांडकर, मनोज गांगे यांनी कारवाईत सहभाग नोंदवला होता.