CoronaMaharashtraUpdate : सावधान, राज्यात वाढताहेत कोरोनाचे रुग्ण , १५९ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येचा आकडा ५ हजारांहून वाढत असून आज दिवसभरातही ५ हजार १०८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ७३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ५२ हजार १५० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतके झाले आहे. दुसरीकडे आज राज्यात १५९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. सध्या राज्यात ५० हजार ३९३ सक्रिय रुग्ण आहेत.
दरम्यान मुंबईत आज दिवसभरात ३९७ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५०७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के आहे. तर दिवसभरात ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ४२ हजार ४०१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ७ लाख २१ हजार २५७ जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत २ हजार ७३६ सक्रिय रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत एकून १५ हजार ९६३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ९० लाख ६० हजार ४२३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. १९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट दरम्यान करोना रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्के इतका होता. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा १,८२५ दिवसांवर पोहोचला आहे. आतापर्यंत मुंबईत सक्रिय रुग्ण संख्या असलेल्या २४ इमारती सीलबंद करण्यात आल्या आहेत.