Aurangabad Crime Update : आयकर अधिकारी असल्याची थाप मारुन खंडणी उकळण्याचा प्रयत्न, एकास अटक

औरंगाबाद : इन्शूरन्स एजंटने ओळखीचा गैरफायदा घेत दोन साथीदारांना सोबंत घेत बिल्डर ला ६० लाख रु.खंडणी मागितल्या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी हाॅटेल मालकाला बेड्या ठोकल्या.
अरविंद जवळगेकर, महेश चौधरी व संजय पारख सर्व रा.बीडबायपास अशी आरोपींची नावे आहेत. यातील महेश चौधरीला अटक करण्यात आली असून तो एक हाॅटेलचा मालक असल्याचे पोलिस तपासात उघंड झाले.तर अन्य दोघे फरार झाले आहेत.
गेल्या ७ आॅगस्ट पासून वरील आरोपी शिवशंकर काॅलनीत राहणारे बांधकाम व्यावसायिक सुशांत गिरी (३५) यांना दोन कोटी रु.आयकर बुडवल्याबद्दल कारवाई करण्याची धमकी देत होते. तसेच प्रकरण बाहेरच्या बाहेर मिटवायचे असल्यास ६० लाख द्या. अन्यथा गून्ह्यात अडकवू असे म्हणाले. या प्रकारानंतर गिरी यांना फसवल्या जात असल्याचे लक्षात आले. कारण दीड ते दोन कोटी आयकर बुडवण्या इतके मोठे व्यवहार त्यांचे नाहीत. तरीही ११ आॅगस्ट पर्यंत वरील तिन्ही आरोपी गिरी यांच्यावर दबाव आणत होते.
हा सर्व प्रकार पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी गिरी यांना तक्रार देण्यास सांगितले.शेवटी आज दुपारी या प्रकरणी तिन्ही आरोपींवर तोतयेगिरी व खंडणी उकळण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शेळके करंत आहेत.
काही वर्षांपूर्वी अक्षयकुमार अनुपम खेर यांचा स्पेशल २६ हा सिनेमा गाजला होता.त्या सिनेमातील घटनेचीपुनरावृत्ती शहरात झाल्यामुळे पोलिसांनीजनतेला आवाहन केले की, आणखी कोणी फसवले गेले असल्यास पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.