AurangabadNewsUpdate : राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेनेकडून पोलिसांना निवेदने

औरंगाबाद – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर औरंगाबादेत आ.अंबादास दानवे व शिवसेनेचे राजू वैद्य यांनी क्रांतीचौक आणि पुंडलिकनगर पोलिसांना राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदने दिली आहेत. पोलिस निरीक्षक डाॅ.गणपत दराडे व दिलीप गांगूर्डे यांनी दोन्ही निवेदने पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांच्याकडे सोपवली आहेत.
केंद्रीयमंत्री नारायण राणेंना रत्नागिरी पोलिसांनी अटक केल्याचे समजताच शिवसेनेने शहरात आक्रमक भूमीका घेत पोलिसांना निवेदने दिली आहेत. दरम्यान भाजपा शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी कार्यकर्त्यांना सोबंत घेत राज्यशासनाच्या विरोधात क्रांतीचौकात निदर्शने केली.वरील दोन्ही घटनांविषयी केंद्रीयराज्यमंत्री डाॅ.भागवत कराड यांनाप्रतिक्रिया घेण्यासाठी फोन केला असता त्यांनी फोन उचलणे टाळले.