धक्कादायक : माजी मंत्री , सेना नेते संजय राठोडवर शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप

मुंबई: आधीच बंजारा समाजातील एका २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्यामुळे बदनाम झालेले शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड आणखी अडचणीत आलेले आहेत. कारण त्यांच्यावर पुन्हा एका महिलेने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार दिल्याचा आरोप चित्ररा वाघ यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यातील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्याच प्रकरणातून संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. त्यानंतर अनेक दिवसांपासून संजय राठोड यांना अटक करा, अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत संजय राठोड यांच्यावर गंभार आरोप केले आहेत. संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखीत तक्रार एका भगिनीने यवतमाळ पोस्टाने पाठवली, असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच आजही संजय राठोड शरीरसुखाची मागणी करुन लैगिंक छळ करत असल्याचं तक्रार करणाऱ्या महिलेनं म्हटलं असल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे.
चित्रा वाघ यांच्या आरोपानंतर राज्यातील राजकारण आणखी तापणार असल्याचं दिसून येत आहे. मात्र संजय राठोड यांच्याकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आली नसून, चित्रा वाघ यांच्या आरोपावर काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या युवतीने वानवडीतील हेवन पार्क इमारतीतल्या सदनिकेतून उडी मारून आत्महत्या केली होती. ही घटना ७ फेब्रुवारीला घडली होती. या प्रकरणाशी तत्कालिन वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
याशिवाय पूजा चव्हाण हिची आत्महत्या होण्यापूर्वी तिचा आणि एका व्यक्तीमध्ये झालेले संभाषण व्हायरल झाले होते. या संभाषणातील एक आवाज माजी मंत्री संजय राठोड यांचा असल्याचा अहवाल न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेने दिला होता. याला पुणे पोलिसांनी अधिकृतपणे दुजोरा दिला असून हा अहवाल दोन महिन्यांपूर्वीच मिळाल्याचे सांगितले आहे