Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraRainUpdate : काळजी घ्या : मुंबई आणि परिसरात वाऱ्यांसह जोरदार पाऊस तर मराठवाड्यात मुसळधार

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : येत्या ३ ते ४ तासात राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण आणि उपनगरातील भागांमध्ये वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. या भागात वाऱ्यांचाही  वेग वाढला असून नागरिकांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.

Advertisements

राज्याच्या हवामान विभागाला नुकत्याच मिळालेल्या  सॅटेलाइट चित्रानुसार मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड या घाट भागांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता IMD ने वर्तवली आहे. त्याशिवाय विदर्भातील काही भागातही पावसाला सुरुवात झाल्याचं दिसत आहे. या माहितीनुसार नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, धुळे, कोल्हापूर, नांदेड, हिंगोली, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद या भागात येत्या ३ ते ४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!