AurangabadCrimeUpdate : १२ लाख रुपये घेऊन , २१ नखी कासवासह लेब्रो डॉग न दिल्याने लग्नास दिला नकार , सैनिकांविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद – आसाम रेजिमेंटमध्ये सैनिक असणार्या तरुणाने फेब्रूवारीमधे साखरपूडा केला. पण सासुरवाडीकडून २१ नखी कासव न मिळाल्यामुळे हुंड्यापोटी दिलेले १२ लाख ११ हजार रु. हडपले व लग्नास नकार दिला. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रविंद्र चराटे रा.नाशिकरोड व त्याच्या कुटुंबातील अन्य चार जणांचा आरोपी म्हणून समावेश आहे.
या विषयीची अधिक माहिती अशी कि , फेब्रूवारी २१ मध्ये रमानगर येथे राहणारे अनिल सदाशिवे यांच्या मुलीशी लग्न ठरले. त्यानंतर फेब्रूवारी मधे साखरपुडा पार पडला त्यावेळेस सदाशिवे यांनी २ लाख ११ हजार रु.हुंड्यापोटी दिले. दरम्यान नववधू तलाठी परिक्षा पास झालेली आहे. पण तिचे नियुक्तीपत्र मिळंत नसल्याचे चिरोटे कंपनीला समजताच त्यांनी सदाशिवे यांच्याकडून नववधूला तात्काळ नोकरी लावतो म्हणून १० लाख रु.घेतले. त्यानंतर चिरोटे कुटुंबियांनी सदाशिवे यांच्याकडे २१ नखी कासव आणि लेब्रो जातीच्या काळ्या श्वानाची मागणी केली. अॅनिमल प्रोहिबिशन अॅक्टनुसार हा गुन्हा होत असल्याने सदाशिवे यांनी कासव आणि श्वान देण्यास नकार देताच चिरोटे यांनी लग्नास नकार दिला. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आढाव करंत आहेत.