Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी पुन्हा छेडली सीएए आणि एनआरसीची ताण !!

Spread the love

गुवाहाटी : कोरोनाच्या संसर्गामुळे देशात सीएए आणि एनआरसीविरोधात सुरु असलेली चर्चा मागे पडलेली असताना पुन्हा एकदा या मुद्याला  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात बोलताना पुन्हा एकदा हवा देण्याचा प्रयत्न केला आहे . वादग्रस्त सीएए कडे लोकांचे लक्ष वेधून आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी म्हटले आहे कि,  देशातील मुस्लिमांचे सीएए अर्थात नागरिकत्व कायद्यामुळे कोणतेही नुकसान होणारनाही. गुवाहाटीमध्ये याच विषयावरील एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी बोलताना भागवत यांनी या विषयावरची ताण छेडण्याचा प्रयत्न केला.


यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी सीएए आणि एनआरसीसंदर्भात सुरू असलेला वाद राजकीय फायद्यापोटी घातला जात असल्याचा आरोप करीत म्हटले कि , सीएए (Citizenship Amendment Act) आणि एनआरसी (National Register of Citizens) या दोन्ही कायद्यांमुळे   हिंदू-मुस्लिमंमध्ये फूट पडणार नाही. या निमित्ताने अशा गोष्टींची होणारी चर्चा ही जाणीवपूर्वक राजकीय फायद्यासाठी केली जात आहे.तसेच सीएएमुळे मुस्लिमांचे  कोणतेही नुकसान होणार नाही. याउलट सीएएमुळे देशातील अल्पसंख्याकांना संरक्षण मिळेल, असे देखील नमूद केले आहे.

आपल्या भाषणात भागवत पुढे म्हणाले कि , “स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की देशातील अल्पसंख्याकांची काळजी घेतली जईल. ते अजूनही केलं जात आहे. यापुढेही आपण  ते करतच राहू. यासंदर्भात आपण इतर देशांमध्ये असलेल्या बहुसंख्यकांशी देखील चर्चा केली. यापैकी कुणाला जर धोका किंवा भितीमुळे भारतात यायची इच्छा असेल, तर आपण नक्कीच त्यांना मदत करायला हवी”.

दरम्यान एनआरसी कायद्याचे समर्थन करताना भागवत म्हणले कि , सर्वच देशांना आपले  नागरिक कोण आहेत, हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. यामध्ये सरकार सहभागी असल्यामुळे हे प्रकरण राजकीय व्यासपीठावर गेले  आहे. सीएए आणि एनआरसी या दोन्ही मुद्द्यांभोवती सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या गोष्टी पसरवून त्यातून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!