AurangabadCrimeUpdate : मुंबईहून आला होता फोन … एटीएम फोडणाऱ्या परप्रांतीय टोळी गजाआड

औरंगाबाद – धूत हास्पिटल समोरील एसबीआय बॅंकेचे एटीएम फोडून १३ हजार रु.लंपास करणार्या टोळीतील तिघांना सिडको औद्योगिक पोलिसांनी अटक केली. रोहितसिंग विजयबहादुर सिंग(२९) ,अंकुश बढेलाल मोर्या रा जि.प्रतापगढ उत्तरप्रदेश तर तिसरा संजय शंकरलालपाल (२१) रा.जि.प्रयागराज उत्तर प्रदेश यांना मुकुंदवाडी पोलिसांनी सिंधीबन काॅलनीत पाठलाग करंत पकडले.
इलेक्ट्रॉनिक्स पेमेंट सर्विसेसचे अभिजित निकुंभ यांना त्यांचे सहकारी आशिष खंडागळे यांनी फोन केला की,यांना मुंबईहून फोन आला की, शहरातील धूत हाॅस्पिटल जवळील एसबीआय चे एटीएम फोडण्याचा प्रयत्न होत आहे. हा प्रकार कळल्यानंतर निकुंभ यांनी पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे व पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांना सांगून एटीएम कडे धाव घेतली.व एटीएम मधे असलेल्या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला.यातील फरार आरोपी आलोकपाल व भैय्या नावाच्या चोरट्यांनी १३हजार रु.लंपास केले.तर ७हजार रु. एटीएम मधेच अडकल्याचे आढळले.
वरील कारवाई पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे, शरद इंगळे, इलेक्ट्रॉनिक्स पेमेंट सर्विसेसचे आशिष खंडागळे, आशिश चव्हाण, सुशील धुळै यांनी पार पाडली. पुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको औद्योगिक पोलिस करंत आहेत.