Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बालकाच्या हत्येनंतर पती पत्नीसह तिघांची आत्महत्या, जळगाव जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना

Advertisements
Advertisements
Spread the love

मागच्या आठवड्यात बालकाची हत्या झालेल्या कुटुंबातील पती, पत्नीसह तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज समोर आली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरात घडली. बब्बू सय्यद (वय ४८), पिंकी सय्यद (वय ३८) आणि नेहा सय्यद (वय १६) अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत.

Advertisements

मागील आठवड्यात याच कुटुंबातील नऊ वर्षीय बालक इसम सय्यद याची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आता इसमचे वडील, आई आणि बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आल्याने या घटनेमागे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisements
Advertisements

घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा केला जात आहे. बालकाच्या खुनाच्या घटनेचे कनेक्शन आजच्या आत्महत्येच्या घटनेशी आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. या तिघांनी आत्महत्या का केली, याचे कारण समोर आलेले नाही. सय्यद कुटुंबीय हे मूळचे नागपूर येथील होते. काही वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त ते भडगावात आलेले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!