CoronaMaharashtraUpdate : राज्यात ८,७५३ नवे रुग्ण , ८,३८५ रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात ८,७५३ नवीन रुग्ण आढळून आले असून ८,३८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५८,३६,९२० करोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०१ टक्के एवढे झाले आहे. मात्र आज १५६ कोरोना बाधितांना आपला जीव गमवावा लागला. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे.
राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४,२०,९६,५०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,७९,३५२ (१४.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात ६,२४,७४५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ४,४७२ व्यक्ती सांस्थातमक क्वारंटाईनमध्ये आहेत.
खरंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये करोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. केवळ ६ जिल्ह्यांमध्ये मुंबई १२९०५ , ठाणे १६३३९, पुणे १७०१३ ,सांगली १०९९९ आणि कोल्हापूर १२७६७ अशी रुग्णसंख्या आहे. याखालोखाल रायगडमध्ये ५२१२, रत्नागिरीत ५४१६, सिंधुदुर्गात ४२०६, साताऱ्यात ७७७४, नाशिक या जिल्ह्यात ३३५९ सक्रिय रुग्ण आहेत.