AurangabadCrimeUpdate : गतिमंद मुलीवर बलात्कार , सीसीटीव्ही फुटेजवरून आले उघडकीस , आरोपी अटकेत

औरंगाबाद – गेल्या आठवड्यात सिडकोतील त्रिवेणीनगर परिसरात अंदाजे(३२) वर्षीय गतीमंद महिलेवर दोन नराधमांनी बलात्कार केल्याची घटना दुकानदाराच्या सी.सी. टि.व्ही.मधे कैद झाली.रविवारी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. टोंग्या उर्फ आकाश भगवान तुपे(२०) रा. एन७सिडको असे अटक आरोपीचे नाव आहे. हा आरोपी चोरुन दारु विक्री करत असल्याचे पोलिस तपासात उघंड झाले.
त्रिवेणी नगरात असलेल्या किराणा दुकानाशेजारी लघुशंका केल्याचा घाण वास येत होता म्हणून सी.सी. टिव्ही फुटेज चेक करत असतांना दोन नराधमांनी गतीमंद महिलेवर २६जूनला बलात्कार केल्यानंतर दुकाना शेजारी लघुशंका केल्याचे फुटेज दिसले. यापूर्वी ही घटना २० तारखेला घडल्याचे फुटेज दिसल्यावर दुकानदाराने सिडको पोलिस ठाण्यात तक्रार देताच सिडको पोलिसांनी टोंग्याला अटक केली आहे.पुढील तपास सिडको पोलिस करंत आहेत