BJPAndolanUpdate : राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेले : देवेन्द्र फडणवीस

नागपूर : राज्य सरकारने आपल्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण घालवले , ओबीसी आरक्षण घालवले , पदोन्नतीतील आरक्षण घालवले. असा राज्य सरकारवर घणाघात करीत , पुढच्या तीन चार महिन्यात आपण ओबीसीच आरक्षण परत आणू शकतो. मी तर सांगतो, खऱ्या अर्थाने आमच्या हाती जर सूत्र दिली. तर मी दाव्याने सांगतो, ओबीसींचे राजकीय आरक्षण जर परत आणू शकलो नाही, तर राजकीय संन्यास घेईन, असे देखील फडणवीस यावेळी म्हणाले.
मराठा आरक्षणा पाठोपाठ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, या मागणीसाठी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. दरम्यान, नागपुरमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. यावेळी फडणवीसांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ” सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण देण्यासाठी सांगितले आहे. तो सेन्ससचा डेटा नाही, तो इम्पॅरिकल डेटा आहे आणि तो राज्य मागासवर्ग आयोगाला जमा करायचा आहे. पण या सरकारचे एक मस्त आहे, यांचे एकमेकांशी पटत नाही. पण एका गोष्टीवर यांचा एक सूर आहे, बाकी एकमेकांचे लचके तोडायला ते तयार आहेत, पण सत्तेचे लचके तोडतांना एक आहे. आणि जिथे हे पडले धडपडले, जिथे अपयशी ठरले, नापास झाले तिथे एका सूरात बोलतात मोदींनी केलं पाहिजे… मोदींनी केलं पाहिजे. मला तर असं वाटतं, एखाद्या दिवशी यांच्या बायकोने यांना मारलं तर त्यालाही हे मोदींनाच जबाबदार ठरवतील, अशाप्रकारची ही परिस्थिती आहे. म्हणजे स्वतः काही करायचं नाही.
राज्य सरकारला वेळकाढू धोरण करायंचं आहे, हे गंभीर नाहीत. ही लोकं जाणीवपूर्वक सांगितलेली कार्यवाही करत नाहीत, म्हणून आम्ही ५० टक्क्यांच्या आतलं आरक्षणही रद्द करतो.संपूर्ण भारतात महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. जर मोदींचा संबंध असता, तर उत्तर प्रदेशात ओबीसी आरक्षण का आहे? मध्य प्रदेशात, छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये का आहे? देशाच्या प्रत्येक राज्यात ओबीसी आरक्षण शिल्लक आहे. तुमची १५ महिने पूर्ण होता होता, केवळ महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण गेलं आहे. तुमचा यामध्ये काय डाव आहे हे आमच्या लक्षात येतं आहे.” असंही फडणवीस म्हणाले आहेत.
एकतर ओबीसी आरक्षण द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा!
ज्यांनी सर्व समाजांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचले, त्या छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी ओबीसी आरक्षणासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यात निर्णायक लढ्याचा प्रारंभ झाला.#OBCvirodhiMVA pic.twitter.com/49mqyth4Kp— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) June 26, 2021