MumbaiCrimeUpdate : धक्कादायक : पोलीस अधिकारी असलेल्या महिलेसोबतही असे घडले !!

मुंबई : स्त्री – पुरुष समानतेच्या काळात मैत्री हातचे राखून करावी असा धडा शिकवणाऱ्या अनेक घटना आपल्या अवती भवती घडतात पण त्यापासून कोणीच काही शिकत नाही हेच खरे आहे. मुंबईतील एका महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत अशीच एक घटना घडली आहे. म्हणून मुलींनी आणि महिलांनी शोषलं मीडियावर मंत्री करताना जरा जपूनच केलेली बारी हे पुन्हा या निमित्ताने समजून घेण्याची गरज आहे.
कथा सर्वसाधारण अशीच आहे . पीडित महिला मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय पदावर कार्यरत आहे. काही वर्षांपूर्वी तिची सोशल मीडियावर एका खाजगी बँकेत अधिकारी पदावर काम करणाऱ्या व्यक्तीची ओळख झाली होती. सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर दोघांत मैत्री वाढत गेली. कालांतराने यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. दरम्यान आरोपी प्रियकर एकेदिवशी पीडित महिलेला चकाला येथे भेटायला आला होता. याठिकणी आरोपीने पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरचं थांबला नाही, तर त्याने लैंगिक अत्याचार करतानाचा व्हिडीओही शूट केला आणि हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने अनेकदा पीडितेवर लैंगिक अत्याचार केला.
दरम्यान पीडित महिलेचे एका तरुणाशी लग्न ठरले होते . याची माहिती आरोपीला मिळताच त्याने पीडितेच्या होणाऱ्या नवऱ्याला याची माहिती देऊन तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. आरोपी पीडितेला सतत ब्लॅकमेल करून अत्याचार करत होता. त्यामुळे पीडित महिला अधिकाऱ्याने आरोपीच्या त्रासाला कंटाळून मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर मेघवाडी पोलिसांनी एमआयडीसी अंधेरी पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून पोलीस घटनेचा तपास करत आहे.