Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : गाठी-भेटी : खा. संभाजीराजे दौऱ्यावर तर अजित पवार त्यांच्या न्यू पॅलेस मध्ये…

Advertisements
Advertisements
Spread the love

कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा लढा उभारण्यासाठी खासदार संभाजीराजे राज्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये जाऊन न्यू पॅलेस येथे श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी संभाजीराजे यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे सुद्धा उपस्थितीत होते. या भेटीमुळे कोल्हापूरमध्ये चर्चेंना उधाण आले आहे.

Advertisements

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे. आज सकाळी अचानक अजित पवार यांचा ताफा न्यू पॅलेसकडे वळला. अजित पवार यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. तब्बल तासभर ही बैठक सुरू होती. यावेळी मराठा संघटनेचे काही नेते सुद्धा उपस्थितीत होते, अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, संभाजीराजे यांनी १६ तारखेला कोल्हापुरात मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!