AuranagabadNewsUpdate : खंडपीठाची विचारणा, खराब व्हेंटिलेटर करणार्या कंपन्यांवर केंद्राने काय कारवाई केली

औरंगाबाद – केंद्रशासनाकडून शहरातील शासकीय रुग्णालयांना खराब व्हेंटिलेटर पुरवणार्या कंपन्यांवर केंद्रशासनाने काय कारवाई केली. अशी विचारणा न्या.रविंद्र घुगे आणि बी.यू.देबडवार यांच्या खंडपीठाने असिस्टंट साॅलिसिटर जनरल अजय तल्हार यांना येत्या २८मे पर्यंत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
पी.एम. केअर फंडातून
अहमदाबाद स्थित कंपन्यांनी शहरातील शासकिय रुग्णालयांना १९१व्हेंटिलेटर्स दिले.त्यापैकी ११३शासकिय रुग्णालयांना मिळाले ४७खाजगी रुग्णालयांकडे शासकिय रुग्णालयामार्फत देण्यात आले तर ३७व्हेंटिलेटर्स उघडून बघण्यात आले नाही. हे व्हेंटीलेटर्स खराब आहेत किंवा चांगले आहेत यावर राजकारणी लोकांनी मत प्रदर्शित करणे योग्य नाही.कोणताही राजकारणी याबाबतीत तज्ञ नसल्याचा निर्वाळा खंडपीठाने दिला.राजकिय रंग देऊन रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. अशी तीव्र नाराजी खंडपीठाने आदेशातून व्यक्त केली.
अॅड. सत्यजित बोरा यांनी अमिकस क्युअर म्हणून सहभाग नोंदवला आहे.तर सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे,यांनी सहभाग नोंदवला.