AurangabadCrimeUpdate : पत्नीचा शारीरिक, मानसिक छळ करणा-या नवर्याचा खून, पत्नीसह दोघांना बेड्या

औरंगाबाद : दारु पिऊन पत्नीचा शारिरीक व मानसिक छळ करणार्या खाजगी वाहनचालकाला निर्मनुष्य जागेत नेत मारुन टाकल्या प्रकरणी स्थानिक गुन्हेशाखेने त्यांच्या पत्नीसह आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपी हा मयताच्या पत्नीच्या मैत्रिणीचा पती असून या प्रकरणी शिवूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
काकासाहेब सर्जेराव खुटे (३५) रा.दरेगाव व नंदा जाधव(३०) अशी अटक आरोपींची नावे आहेत. नंदाचा पती अण्णा जाधव हा क्रुझर गाडी चालवत होता. तो बायकोला सतत दारु पिऊन मारहाण करायचा नंदा ची मैत्रीण आरोपी खुटे ची पत्नी आहे. तिने मैत्रीणीला नवर्यापासून होणार्या त्रासाबद्दल माहिती दिली होती. व नवर्याला दोन्ही नवरा बायकोने समजावून सांगा अशी विनंती केली. पण आरोपी काकासाहेबने बायकोच्या मैत्रीणीशी संबंध जुळवत आण्णा जाधवचा औराळा परिसरात कमरेचा पट्टा आवळून खून केला. असा कबुली जबाब आरोपी खुटे ने गुन्हे शाखेला दिला.
वरील कारवाई पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पीएसआय संदीप सोळंके, गणेश राऊत, पोलिस कर्मचारी उमेश बकले,ज्ञानेश्वर मेटे, गणेश गांगवे रामेश्वर धापसे, योगेश तरमाळे,यांनी सहभाग घेतला.पुढील तपास शिवूर पोलिस करत आहेत