CoronaMaharashtraUpdate : राज्यात ४८ हजार २११ रूग्ण करोनातून मुक्त , ५१६ मृत्यू

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात ४८ हजार २११ रूग्ण करोनातून बरे झाले तर, २६ हजार २११ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. याशिवाय ५१६ रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.
Maharashtra reports 26,616 new #COVID19 cases, 48,211 recoveries and 516 deaths in the last 24 hours.
Total cases 54,05,068
Total recoveries 48,74,582
Death toll 82,486Active cases 4,45,495 pic.twitter.com/6YBuyCaP85
— ANI (@ANI) May 17, 2021
आजपर्यंत राज्यात ४८,७४,५८२ रूग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) आता ९०.१९ टक्के झाले आहे. याचबरोबर आजपर्यंत राज्यात ८२ हजार ४८६ रूग्णांचा मृत्यू झाला असून, राज्याचा मृत्यू दर आता १.५३ टक्के आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या ३,१३,३८,४०७ नमुन्यांपैकी ५४,०५,०६८ नमुने (१७.२५) टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या राज्यात ३३,७४,२५८ रूग्ण गृहविलगीकरणात आहेत, तर, २८ हजार १०२ रूग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. याशिवाय, राज्यात ४,४५,४९५ अॅक्टिव्ह केसेस आहेत.