Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : दोन वेळा लस घेऊनही विभागीय आयुक्त दुसऱ्यांदा कोरोनाबाधित

Spread the love

पुणे : पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दुसऱ्यांदा करोनाचा संसर्ग झाला आहे. विशेष म्हणजे त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असूनही त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

या अगदोर मार्च महिन्यात विभागीय आयुक्त सौरभ राव यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. तर, करोनावरील पहिली लस घेतल्यानंतर अगदी काही दिवस होत नाही, तोच त्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यातून बाहेर पडून, प्रशासकीय कामाला देखील त्यांनी सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी लसीचा दुसरा डोस शुक्रवारी घेतला होता. त्यामुळे त्यांना ताप आल्याने, सौरभ राव यांनी पुन्हा करोनाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांचा रिपोर्ट पुन्हा एकदा करोना पॉझिटिव्ह आला.

दररोज प्रशासकीय बैठक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत प्रत्येक आठवड्याला करोना आढाव बैठक होत असल्याने, आता सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना करोनाची चाचणी करावी लागणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!