AurangabadNewsUpdate : मासेमारीसाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

औरंगाबाद : मासे पकडण्यासाठी हर्सुल सावंगीच्या तलावात गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दुपारी ४. ३० वाजता सुमारास घडली. करण दशरथ निकम (२३) आणि नितीन विजय गायकवाड (२१, दोघेही रा. इकबबाल नगर, फकीरवाडी हर्सुल) अशी मृत दोघांची नावे आहे.
रविवारी दुपारी करण आणि नितीन हे त्यांच्या इतर मित्रांसोबत तलावावर मासे पकडण्यासाठी गेले होते. याच दरम्यान दोघेही आंघोळीसाठी पाण्यात उतरले. मात्र, या दोघांना पोहता येत नसल्यामुळे त्या दोघांना स्वत:ला सावरता आले नाही. त्यावेळी तलावावर इतर मुले होती. त्यांनी आरडा-ओरड केली. मात्र, कोणाचीही दोघांना वाचवण्याची हिंमत झाली नाही. दरम्यान ग्रामीण पोलिस कर्मचारी काकासाहेब पंडोरे यांनी उडी मारुन दोघांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.पण यश आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
करण हा काही दिवसांपूर्वी वाळूज येथे कंपनीत काम करण्यासाठी जात होता. काही दिवसांपासून त्याने नोकरी सोडून प्लबिंग काम सुरु केले होते. तो विवाहीत असून, त्याला एक मुलगा देखील आहे. त्याला एक थोरला भाऊ, तीन बहीणी आहेत. तर नितीन सध्या कामाच्या शोधात असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच हर्सुल पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक ठोकळ, जमादार राजेंद्र तांदळे, गाडेकर, हेमंत बोबडे, शिंदे हे घटनास्थळी पोहचले. सुरुवातीला करणला पाण्याबाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या यश आले. त्याला तात्काळ उपचारासाठी घाटीत नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर नितीनचा मृतदेह घाटीत नेण्यात आला.