Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : देशातील २६ राज्यांत लॉकडाऊन सदृश्य निर्बंध, सक्रिय रुग्णांची संख्या ३७ लाख ४५ हजार २३७

Spread the love

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांतील आकडेवारी मागील काही दिवसांतील आकडेवारीच्या तुलनेत दिलासा देणारी असली, तरी समाधानकारक ननाही . देशात रविवारी दिवसभरात तीन लाख ६६ हजार १६१ नवीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन लाख ५३ हजार ८१८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब म्हणजे करोनामुळे होत असलेल्या मृत्यूंचं संकट मात्र कायम आहे. देशात गेल्या २४ तासांत तीन हजार ७५४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या दोन लाख ४६ हजार ११६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात सध्या ३७ लाख ४५ हजार २३७ रुग्ण उपचार घेत आहेत.

दरम्यान देशातील २६ राज्यांत लॉकडाउन सदृश्य निर्बंध लावण्यात आले आहेत. देशात कोरोनाचा गतीने संसर्ग  होत असून, आठवडाभरात पाचव्यांदा दैनंदिन रुग्णसंख्या चार लाखांहून अधिक नोंदवण्यात आली आहे. देशात रविवारी कोरोनाचे ४,०३,७३८ रुग्ण आढळले, तर ४,०९२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे करोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी दिल्ली, उत्तर प्रदेश सरकारने निर्बंध आणखी आठवडाभरासाठी वाढविण्याचा निर्णय रविवारी घेतला. रुग्णवाढीमुळे तमिळनाडू, कर्नाटकमध्ये आजपासून (१० मे) लॉकडाउन लागू करण्यात येत असून, देशातील जवळपास २६ राज्यांत लॉकडाउनसदृश निर्बंध लागू आहेत.

देशभरात कोरोना संसर्गामुळे  दररोज साडेतीन ते चार लाख रुग्णांची भर पडत आहे. रुग्णसंख्येच्या विस्फोटामुळे आरोग्य सुविधा कोलमडताना दिसत असून, वेळेत उपचार न मिळाल्याने, त्याचबरोबर ऑक्सिजन वा इतर सुविधांअभावी रुग्णांचे प्राण जात आहे. देशातील मृत्यूचा वेग अजूनही कायम असून, दररोज साडेतीन ते चार हजारांच्या सरासरीने मृत्यू होत आहे. त्यामुळे एकूण करोना बळींची संख्या अडीच लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील हि आकेडवारी जाहीर केली आहे.

दुसऱ्या लाटेबाबत  अनेक तज्ज्ञांचे  वेगवेगळे अंदाज

दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत देश आणि विदेशातील अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. यानुसार, भारतात दहा दिवसांनंतर सर्वात कठीण परिस्थिती असेल. अनेक तज्ज्ञांनी आपल्या रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे, की मे महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक पाहायला मिळेल आणि या काळात देशात 35 ते 40 लाख सक्रीय रुग्ण असतील. तर, अनेक तज्ज्ञांनी असेही म्हटले  आहे, की दुसऱ्या लाटेत जितक्या झपाट्याने  रुग्णसंख्या वाढली, तितक्याच झपाट्याने  ती कमीदेखील होईल. ही बाब दिलासादायक आहे.

एसबीआय रिसर्च रिपोर्टनुसार, देशात कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या मध्यापर्यंत उच्चांकावर असेल. रिपोर्टमध्ये असे  म्हटले आहे, की या काळात देशात कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 36 लाखाच्या आसपास असेल. इतर देशांचे अनुभव पाहाता कोरोनाची दुसरी लाट तेव्हा उच्चांकावर असेल जेव्हा रिक्वहरी रेट 77.8 टक्के होईल. तर आयआयटी कानपूर आणि हैदराबादच्या गणितीय मॉडेलनुसार, कोरोना महामारीची दुसरी लाट 11 ते 15 मेदरम्यान पीकवर असेल. शास्त्रज्ञांचे  असे  म्हणणे  आहे, की त्यावेळ देशात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 33 ते 35 लाखापर्यंत पोहोचू शकते. मे महिन्याच्या शेवटापर्यंत रुग्णसंख्येत झपाट्याने  घट होणार. मात्र, ही घट येण्याआधी मेच्या मध्यापर्यंत सक्रीय रुग्णांची संख्या 10 लाखाने वाढेल.

दरम्यान ब्राउन युनिवर्सिटीच्या आशीष के झा यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णसंख्या उच्चांक कधी गाठेल हे ज्या त्या राज्यांवर अवलंबून आहे. महाराष्ट्रात आधीच रुग्णसंख्येचा उच्चांक गाठलेला आहे. तर, पश्चिम बंगालसह इतर राज्यांमध्ये हा उच्चांक येणे आणखी बाकी आहे. त्यांनी म्हटले आहे , की माझ्या मतानुसार, जून महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळतील.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!