AurangabadCrimeUpdate : चाकू हल्ला करुन पळणारे पाठलाग करुन पकडले, दौलताबाद पोलिसांची कामगिरी

औरंगाबाद – खंडणीच्या उद्देशाने हाॅटेल मालकाच्या भावाला कागजीपुर्यात चाकूने भोसकून पळ काढणार्या चौघांना दौलताबाद पोलिसांनी पाठलाग करुन आज संध्या सव्वासहा वा. माळीवाड्यात पकडले.व पुढील कारवाईसाठी खुलताबाद पोलिसांच्या हवाली केले.
अक्षय बोडखे रा.खुलताबाद असे जखमी चे नाव असून भारत सुदाम कांबळे (३७) रा.जालना, संकेत राजू खंडागळे (२६) उस्मानपुरा, सय्यद हारुण सय्यद उर्फ भुर्या १८ रा.राजनगर मुकुंदवाडी,अशोक लगोटे(२३) रा.मुकुंदवाडी असे खुलताबाद पोलिसांच्या हवाली केलेल्या आरोपींची नावे आहेत.
रविवारी संध्याकाळी सहा च्या सुमारास वरील आरोपींनी अक्षय बोडखे यांच्पावर चाकू हल्ला करुन औरंगाबादकडे कारमधे बसून पळ काढला.त्यांच्या पाठीमागे जखमी बोडखे हे सहकार्याबरोबर हल्लेखोरांच्या कारचा पाठलाग करत होते. त्याच वेळेस दौलताबाद पोलिस ठाण्याचे पीएसआय रवी कदम हे नाकाबंदी करत होते. जखमी बोडखे ने पीएसआय कदम यांना पुढे गेलेल्या कारमधील इसमांनी हल्ला केल्याचे सांगताच तत्परतेने कदम यांनी पाठलाग करंत माळीवाड्याजवळ हल्लेखोरांना ताब्यात घेत खुलताबाद पोलिसांकडे सोपवले. वरील कारवाईत पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी दौलताबाद पोलिसांना मार्गदर्शन केले.