CoronaMaharashtraUpdate : कोरोनाबाधितांची संख्या ५० हजाराच्यावर तर राज्यात ८९८ मृत्यू

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून गेल्या २४ तासांत राज्यात ५४ हजार २२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर त्याचवेळी ३७ हजार ३८६ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. दरम्यान राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा आता ६ लाख ५४ हजार ७८८ इतका झाला आहे तर ८९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक १०२ मृत्यू नाशिक जिल्ह्यात झाले आहेत.
Maharashtra reports 54,022 new #COVID19 cases, 37,386 recoveries and 898 deaths in the last 24 hours.
Total cases 49,96,758
Total recoveries 42,65,326
Death toll 74,413Active cases 6,54,788 pic.twitter.com/WZMjIHs3rQ
— ANI (@ANI) May 7, 2021
राज्यातील आरोग्य यंत्रणांचे अथक प्रयत्न आणि मोठ्या प्रमाणात होत असलेले कोविड लसीकरण यामुळे रुग्णवाढ नियंत्रणात ठेवण्यात यश आले असून ७० हजारांच्या उंबरठ्यावर गेलेला दैनंदिन रुग्णांचा आकडा सध्या ५० हजारांच्या जवळपास आला आहे. मात्र हा आकडा सुद्धा मोठा असल्याने चिंता कायम आहे. ही रुग्णसंख्या कमी करण्याचे व रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढवण्याचे मोठे आव्हान सध्या आहे.
राज्यातील कोविडची आजची आकडेवारी पाहिल्यास मृतांचा आकडा वाढताच असल्याचे स्पष्ट होत आहे.
अशी आहे आजची आकडेवारी…
– राज्यात आज ८९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
– राज्यातील करोना मृत्यूदर सध्या १.४९ टक्के एवढा आहे.
– दिवसभरात ५४ हजार २२ नवीन रुग्णांचे निदान झाले.
– आज ३७ हजार ३८६ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
– आतापर्यंत एकूण ४२ लाख ६५ हजार ३२६ रुग्ण झाले बरे.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.३६ टक्के एवढे झाले आहे.
– आजपर्यंत २ कोटी ८९ लाख ३० हजार ५८० कोविड चाचण्या.
– एकूण चाचण्यांपैकी ४९ लाख ९६ हजार ७५८ (१७.२७ टक्के) अहवाल पॉझिटिव्ह.
– सध्या राज्यात ३८,४१,४३१ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये तर २८,८६० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या ६ लाख ५४ हजार ७८८ करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात सर्वाधिक १ लाख २० हजार ५१२ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात हा आकडा ६१ हजार ६८० इतका आहे. मुंबई व ठाणे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. मुंबईत सध्या ५४ हजार १६२ तर ठाणे जिल्ह्यात ४५ हजार ६७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.