IndiaNewsUpdate : गँगस्टर छोटा राजन उर्फ राजेंद्र निकाळजे याचे कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली : गँगस्टर छोटा राजन उर्फ राजेंद्र निकाळजे याचा शुक्रवारी दिल्लीत उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. छोटा राजन करोना कोरोनाबाधित झाल्याने त्याला उपचारासाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात हलवण्यात आले होते . इथेच त्याने अखेरचा श्वास घेतला.कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर २६ एप्रिल रोजी छोटा राजनला AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
https://twitter.com/airnewsalerts/status/1390617364685737986
इंडोनेशियातल्या बालीमधून २०१५ साली अटक करण्यात आल्यानंतर छोटा राजन राजधानी दिल्लीतल्या तिहार तुरुंगात बंद होता. मुंबईत त्याच्याविरोधातील सर्व गुन्हेगारी प्रकरणं सीबीआयकडे सोपवण्यात आली होती. तसंच एका विशेष न्यायालयात या प्रकरणांवर सुनावणी सुरू होती.छोटा राजनवर मुंबईत खंडणी आणि हत्येचे जवळपास ७० फौजदारी गुन्हे दाखल आहेत. २०११ साली पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी राजनला दोषी ठरविण्यात आलं होतं. २०१८ मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
दरम्यान छोटा राजन कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले असल्याने त्याला न्यायालयासमोर सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित केले जाऊ शकणार नाही, असं सोमवारी तिहार तुरुंग प्रशासनाकडून सेशन कोर्टाला सूचित करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात मुंबईतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने राजन आणि त्याच्या साथीदारांना १९९३ च्या मुंबई मालिका बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी हनीफ कडवाला हत्येप्रकरणी निर्दोष मुक्त केले होते.