Assembly Election Results 2021 LIVE : अखेर निवडणूक आयोगाने नंदीग्रामचा निकाल केला जाहीर

तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर भाजपानंही पश्चिम बंगालमधील पराभव स्वीकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे.
‘पश्चिम बंगालमधील विजयासाठी ममता दीदींचं अभिनंदन, केंद्र सरकार पश्चिम बंगाल सरकारला पुढेही सहकार्य करत राहील. जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि करोनाशी लढण्यासाठी सर्वतोपरी मदत करू’, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
‘पश्चिम बंगालमधील जनतेचा मी आभारी आहे. त्यांनी आमच्या पक्षाला आशीर्वाद दिला. भाजपाच्या जागा निश्चित वाढल्या आहेत. भाजपा जनतेची सेवा करत राहील. निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल मी कार्यकत्यांचे आभार मानतो’, असेही त्याने ट्विटमध्ये नमूद केले आहे.
Congratulations to Mamata Didi for @AITCofficial's win in West Bengal. The Centre will continue to extend all possible support to the West Bengal Government to fulfil people’s aspirations and also to overcome the COVID-19 pandemic. @MamataOfficial
— Narendra Modi (@narendramodi) May 2, 2021
शेवटच्या क्षणाच्या चुरशीनंतर अखेर निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी नंदीग्राममधून हरल्याचे जाहीर केले. भाजपच्या शुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा 1737 मतांनी पराभव केला.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयाची हॅटट्रिक झाली असून पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र ममता बॅनर्जींचा मतदारसंघ नंदीग्राममध्ये चित्र अद्यापही स्पष्ट नाही. ममता बॅनर्जी यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर भाजपा सुवेंदू अधिकारी यांचा विजय झाल्याचा दावा केला. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आय़ोगाने फेरमोजणी करण्याची मागणी केली आहे.
बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठिंबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केले. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
रडीचा डाव!
बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल!— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 2, 2021
मी निकाल मान्य करते. पण निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून याविरोधात कोर्टात जाणार आहे. मी सत्य समोर आणणार – ममता बॅनर्जी
I accept the verdict. But I will move the Court because I have information that after the declaration of results there were some manipulations done and I will reveal those: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/JM88edOgAa
— ANI (@ANI) May 2, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : ममता बॅनर्जी या ‘बंगाली’ जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिंमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी प. बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळविला. मी त्यांचे व हिंमतबाज प. बंगाली जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केले ममतादीदोंचे अभिनंदन
Congratulations @mkstalin on your win, a truly well deserved victory! Wishing you the best to serve people who have instilled their faith in you!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 2, 2021
पश्चिम बंगालमध्ये नंदीग्राम मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरत असून काही वेळ पिछाडीवर राहिल्यानंतर नंदीग्राममध्ये मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा आघाडी मिळवली आहे त्यामुळे भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी मागे पडले आहेत.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ च्या निकालाचे कल आता स्पष्ट झाले असून निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मीडियावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केलं आहे. तर, तामिळनाडूमध्ये डीएमकेने मिळवलेल्या निर्णायक आघाडीसाठी शरद पवार यांनी एम के स्टॅलिन यांचंही कौतुक केले आहे. ‘आपल्यावर विश्वास व्यक्त करणाऱ्या जनतेच्या सेवेसाठी शुभेच्छा’ असे ट्विट पवारांनी केले आहे.
‘जबरदस्त विजयासाठी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन ! जनतेच्या कल्याणासाठी तसंच साथरोगामुळे समोर ठाकलेल्या आव्हानाला सामूहिकरित्या सामोरे जाण्यासाठी आपले कार्य चालू ठेवू’ असे शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
West Bengal results
292/292 seats · 148 for majority
Party Lead Won
All India Trinamool Congress 66 146
Bharatiya Janata Party 35 43
Independent 00 01
Rashtriya Secular Majlis Party 01 00
Total 102 190
Asam
121/126 seats · 64 for majority
Party Lead Won
All India United Democratic Front 09 06
Asom Gana Parishad 04 06
Bharatiya Janata Party 29 29
Bodoland Peoples Front 01 02
Communist Party of India (Marxist) 01 00
Independent 01 00
Indian National Congress 23 09
United People’s Party, Liberal 02 04
Total 70 56
Kerala results
140/140 seats · 71 for majority
Party Lead Won
Bharatiya Janata Party 00 00
Communist Party of India 02 15
Communist Party of India (Marxist) 09 53
Congress (Secular) 00 01
Independent 01 05
Indian National Congress 02 19
Indian National League 00 01
Indian Union Muslim League 01 14
Janadhipathiya Kerala Congress 00 01
Janata Dal (Secular) 00 02
Kerala Congress 00 02
Kerala Congress (Jacob) 00 01
Kerala Congress (M) 01 04
Kerala Congress (B) 00 01
Loktantrik Janta Dal 00 01
Nationalist Congress Party 00 02
Revolutionary Marxist Party of India 00 01
Total 16 124
Puducherry results
12/30 seats · 16 for majority
Party Lead Won
All India N.R. Congress 00 10
Bharatiya Janata Party 03 03
Dravida Munnetra Kazhagam 03 03
Independent 02 04
Indian National Congress 00 02
Total: 08 22
कमल हासन VS मयूरा जयकुमार यांच्यात अटीतटीची लढत
अभिनेते आणि मक्कल नीधी मय्यम पक्षाचे प्रमुख कमल हासन यांनीही तामिळनाडू विधानसभा निवडणूक उडी घेतलेली आहे. कमल हासन हे कोईम्बतूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सुरूवातीच्या काही फेऱ्यांमध्ये कमल हासन यांनी आघाडी घेतली. मात्र, आता लीड कमी होताना दिसत आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे मयूर राजकुमार हे निवडणूक लढवत असून, दोघांमध्ये सध्या अटीतटी लढत बघायला मिळत आहे.
Tamil Nadu results
232/234 seats · 118 for majority
Party Lead Won
All India Anna Dravida Munnetra Kazhagam 58 11
Bharatiya Janata Party 04 00
Communist Party of India 02 00
Communist Party of India (Marxist) 02 00
Dravida Munnetra Kazhagam 109 23
Indian National Congress 14 02
Indian Union Muslim League 01 00
Pattali Makkal Katchi 04 00
Viduthalai Chiruthaigal Katchi 03 01
Total 197 37
Pandharpur By Election Result 2021 Live Updates:
पंढरपुरात भाजपचे समाधान अवताडे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल चालू असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके पराभवाच्या छायेत दिसत आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम निकाल यायला रात्रीचे ९ ते १० वाजणार आहेत.पंढरपूर मंगळवेढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. येथे महाविकास आघाडीकडून भालके यांचे पुत्र भगीरथ भालके उभे आहेत तर भाजपकडून समाधान अवताडे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. या दोघांतच मुख्य लढत होती असे चित्र पाहायला मिळाले होते. ही निवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप दोघांसाठीही प्रतिष्ठेची आहे.
- पहिल्या फेरीत भाजपचे समाधान आवताडे ४५० मतांनी आघाडीवर
- दुसऱ्या फेरीअखेर भाजपचे समाधान आवताडे 114 तर भगीरथ भालके 114 मतं, समसमान मतं
- तिसऱ्या फेरीत 635 मतांनी भगीरथ भालके पुढे
- 4 थ्या फेरीअखेर समाधान आवताडे 11303, भगीरथ भालके 11941, भालके 638 ने आघाडीवर
- 5 फेऱ्या पूर्ण भगीरथ भालके 521मतांनी आघाडीवर.
- 7 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 100मतांनी आघाडीवर.
- 8 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 2295मतांनी आघाडीवर
- 11 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1503मतांनी आघाडीवर.
- 12 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1409मतांनी आघाडीवर
- 16 व्या फेरीअखेर समाधान आवताडे 1411 मतांची आघाडीवर
- 17 व्या फेरी अखेर ९०१ मतांनी भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर
- 18 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1209 मतांनी आघाडीवर
- 19 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1022मतांनी आघाडीवर
- 21 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 3486मतांनी आघाडीवर
- 22 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 3908 मतांनी आघाडीवर
- 23 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 5807 मतांनी आघाडीवर
- 25 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 6200मतांनी आघाडीवर
- 36 व्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 4256 मतांनी आघाडीवर
- भाजपचे समाधान आवताडे 3716 मतांनी विजयी