IndiaNewsUpdate : वाईट विज्ञान, वाईट राजकारण आणि वाईट शासन , व्यवस्थेने घेतला डॉक्टरचा बळी !!

नवी दिल्ली : कोरोनामुळे एकीकडे सगळीकडे नकारात्मक स्थिती असताना कोरोना रुग्न्नवर उपचार करणाऱ्या एका संवेदनशील डॉक्टरने रुग्ण बरे होत नसल्याचे पाहून हि गोष्ट इतकी मनाला लागली कि , त्यानेही कोरोना रुग्णांना मरताना पाहून आपले आयुष्यही संपवले आहे.
या वृत्तानुसार दिल्लीतील मॅक्स रुग्णालयातील 35 वर्षाचे डॉक्टर विवेक राय यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. नोव्हेंबर 2020 मध्येच त्यांचे लग्न झाले होते . त्यांची पत्नी आता दोन महिन्यांची प्रेग्नंट आहे. डॉक्टर राय हे मूळचे उत्तर प्रदेशच्या गोरखपूरचे. दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात DNB च्या पहिल्या वर्षाचे ते निवासी डॉक्टर होते. गेल्या महिनाभरापासून ते कोरोना ड्युटीवर होते.
COVID WARRIOR dies by Suicide
Dr Vivek Rai,
Resident dr of DNB 1st year at Max Hospital Saket Delhi.
He Was doing covid duty since 1 month and was dealing with icu pts every day and was providing cpr and ACLS for about 7 to 8 patients per day in which not many were surviving. pic.twitter.com/ha5v09Cjwh— Prof Dr Ravi Wankhedkar (@docraviw) May 1, 2021
या संदर्भात माजी IMA प्रमुख डॉ. समीर वानखेडकर यांनी ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि, “डॉक्टर विवेक यांनी त्यांनी कोरोना काळात शेकडो जीव वाचवले आहेत. आयसीयूमधील कोरोना रुग्णांच्या सेवेत ते होते. दररोज सात ते आठ रुग्णांना ते सीपीआर, एसीएलएस देत होते. त्यापैकी बहुतेक जण वाचले नाहीत. डोळ्यांदेखत रुग्णांचा मृत्यू होत होता. अशा तणावपूर्ण परिस्थितीत त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट करण्यासारखा कठीण निर्णय घेतला”
कोरोनाची परिस्थिती हाताळताना आरोग्य कर्मचाऱ्यांवर किती मानसिक ताण येतो आहे, हे यातून स्पष्ट होतं. मुलभूत आरोग्य सुविधांमुळे डॉक्टरांमध्ये तणाव वाढला आहे. त्यामुळे या तरुण डॉक्चरचा मृत्यू सिस्टमद्वारे झालेल्या हत्येपेक्षा कमी नाही आहे. वाईट विज्ञान, वाईट राजकारण आणि वाईट शासन”, अशी टीका डॉ. वानखेडकर यांनी केली आहे. दरम्यान आज तकच्या वृत्तानुसार डॉक्टरने एक सुसाईड नोट लिहिली आहे. ज्यात कुणावरही आरोप करण्यात आलेले नाहीत. माझं कुटुंब आणि माझे मित्र आनंदी राहोत, इतकंच त्यांनी म्हटले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.