AurangabadCrimeUpdate : गायरान जमिनीच्या वादातून तरुणाची गळा चिरुन हत्या , चौघे अटकेत

औरंंंगाबाद : गायरान जमिनीच्या वादातून पाच जणांनी तरुणांची गळा चिरुन हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
ही खळबळजनक घटना शुक्रवारी (दि.३०) मध्यरात्री एकच्या सुमारास येसगाव शिवारातील गणपती गायरानमध्ये उघडकीस आली. कल्याण जायफुल्या पवार असे मृताचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल पवार, अनिस परदेशी चव्हाण, विमल परदेशी चव्हाण, केवल बंडू भोसले अशी अटक मारेकNयांची नावे असून त्यांचा साथीदार पमू बंडू भोसले हा पसार झाला आहे.जाहीरातीबाई जायफुल्या पवार (वय ६०, मुळ रा. पालम, जि. परभणी) ही पती व मुलांसह गणपती गायरान येथील दहा एकर सरकारी गायरान जमिनीवर शेती करते. गेल्या काही दिवसापासून शेतीच्या कारणावरून जाहीरातीबाई पवार आणि राहुल पवार यांच्यात वाद सुरू होता. या वादातूनच कल्याण पवार याचे दोन्ही पाय तोडून त्याचा गळा चिरून गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास हत्या करण्यात आली होती. तसेच त्याचा मृतदेह येसगाव शिवारातील गणपती गायरानमधील शेताजवळ असलेल्या कडुलिंबाच्या झाडाखाली पेâकण्यात आला होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त विवेक सराफ, पोलिस निरीक्षक संदीप गुरमे आदींनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. पोलिसांनी तपासाची चव्रेâ फिरवली. व कारवाई पार पडली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप गुरमे करीत आहेत.