AurangabadNewsUpdate : वेरूळ येथे अपघातात एक जण जागीच ठार

औरंगाबाद : सोलापूर -धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वेरुळ(ता. खुलताबाद) येथील पेट्रोल पंपाच्या बाजूस स्कॉर्पिओ गाडी व दुचाकी यांच्यात गुरुवारी(ता. 22) दुपारी साडेबाराच्या सुमारास अपघात होऊन त्यात एकजण जागीच ठार झाला. सोमीनाथ ( किशोर ) नारायण जाधव (वय ४५) असे मयताचे नाव आहे.
या विषयीची अधिक माहिती अशी कि , सोमीनाथ जाधव हे वेरुळ येथीलहे आपली दुचाकी क्र एम एच २० एफसी ६१३८ वरून वेरुळ गावात येत असताना पाठीमागून जोराने येणाऱ्या स्कॉर्पिओ क्र एम एच ०६ एएल ६२८ ने जोराची धडक दिली असता सोमीनाथ जाधव गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती कळताच ग्रामपंचायत सदस्य साहेबराव पांडव , पोलिस पाटील रमेश ढिवरे , सुदाम थोरात , सचिन जाधव , शिवसागर जाधव यांनी तात्काळ धाव घेत सोमिनाथ जाधव यांना वेरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ बलराज पांडवे यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.
सोमीनाथ जाधव हे अंत्यत मनमिळाऊ स्वभावाचे होते, त्यांच्या अपघाती निधनाने वेरूळ वर शोककळा पसरली आहे.
सदर घटनेची साहेबराव पांडव यांनी खुलताबाद पोलिसात फिर्याद नोंदविला असून पोलीस निरीक्षक सिताराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी हेड काॅन्सटेबल मनोहर पुंगळे , रमेश छत्रे व आर एस भिसे हे तपास करीत आहेत.