MaharashtraNewsUpdate : ऐकत नसाल तर राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन : अजित पवारांचा इशारा

पुणे : करोना संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेत करोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. नियमांचे पालन केले नाही तर कोरोना होवू शकतो. त्यामुळे कठोर वाटणारे निर्णय घेण्याची वेळ आली आहे. जर नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही तर नाईलाजाने राज्यात पूर्वीप्रमाणे पुन्हा कडक लॉकडाऊन करावा लागू शकतो, असा कडक इशारा अजित पवारांनी दिला आहे.
दरम्यान करोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील प्रत्येक आमदारांच्या निधीतून एक कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहितीही यावेळी पवारांनी दिली आहे. संबंधित आमदारांना मतदारसंघात हा निधी खर्च करता येईल, असेही पवारांनी स्पष्ट केले आहे. तसेच, ‘ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी उद्योजक सज्जन जिंदल यांच्याशी संवाद साधला असून, रायगडमधून पुण्यासाठी मुबलक पुरवठा होईल. राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजक मुकेश अंबानी यांच्याशी संवाद साधला आहे,’ अशी माहितीही अजित पवारांनी दिली आहे.